Maharashtra :
मागील आठवड्यात मार्च अखेर व शासकीय सुट्ट्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पाच दिवस बंद होता. खरेदी विक्रीसाठी बाजारात तुर उपलब्ध नसल्याने याचा परिणाम आवका वर झाला. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीचे कामकाज सुरू झाले. राज्यातील खरीप हंगामातील तूर, सोयाबीन सह रब्बी हंगामातील हरभऱ्याला हमीभावापेक्षा चांगले दर मिळाले. तुरी चा भाव दहा हजार पाचशे रुपयाच्या वर कायम आहे. आणि सोयाबीन 4300 रुपये तर हरभरा 5200 रुपये सरासरी दर पाहायला मिळाले. सोयाबीनच्या दारात कोणत्याही प्रकारे सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
या वर्षाच्या हंगामात सोयाबीनला निश्चांक दर मिळाल्यामुळे, शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा कमी दराने केली, यामुळे आगामी हंगामी खरीपत सोयाबीन पिक पेरा कमी होण्याची शक्यता आहे..
तुरीचा दर दहा हजारावर टिकून :
राज्यात तुरीचे उत्पादन घटल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची मागणी वाढली आहे. यामुळे तुरीला चांगले दर व्यापारी वर्गाकडून मिळत आहेत. लाल व पांढऱ्या तुरी च्या भावात 200 ते 300 रुपयाचा फरक पाहायला मिळाला. यावर्षीचा तुरीचा हमीभाव केंद्र सरकारने 7000 रुपये जाहीर केलेला आहे. पण तुरी चा दर दहा हजाराच्या वर आहे.
50% हरभऱ्याची विक्री:
बाजारात निम्मेहून अधिक रब्बी हरभऱ्याची विक्री झाली आहे. हरभऱ्यास सरासरी 5200 ते 5400 च्या दरम्यान दर आहेत. हा दर हमीभावापेक्षा फक्त शंभर ते दीडशे रुपयाने जास्त आहे. हरभरा व सोयाबीनिस चांगले दर मिळाले नसले तरीही शेतकऱ्याने शासकीय खरेदी ऐवजी खुल्या बाजारातच विक्रीसाठी अधिक पसंती दिली आहे. तर तुर पिकास अपेक्षा पेक्षा चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.