PUNE :
Artificial Intelligence, cyber crime ! AI टेक्नॉलॉजी मुळे सायबर क्राईम वाढ : देशात वाढणाऱ्या सायबर क्राईम चा विचार करून सरकार व बँका मार्फत नागरिकांना सावधगिरीचे सूचना त्यांच्या मोबाईलवर संदेशाच्या स्वरूपात पाठवणे सुरू आहे. या संदेशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या साबर गुन्ह्याबद्दल ( Cyber Crime) जागृती केली जात आहे. सरकार या जागृत अभियानाद्वारे नागरिकांना फसव्या जाहिरातीबद्दल सावध करत आहे. या संदेशात असे सांगण्यात येत आहे.., की सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलवर कशाप्रकारे ( Malware Virus ) पाठवून तुमचा मोबाईल हॅक करतो.., आणि नंतर तुमचे बँक खात्यातील रक्कम सहज पूर्णपणे खाली केली जाते. संगणकीय क्षेत्रात सायबर गुन्ह्याचा शिरकाव झाल्याला हा चिंतेचा विषय आहे. संगणक इंटरनेट इत्यादींच्या माध्यमातून जर नागरिकांना ई-मेलद्वारे, संदेशद्वारे त्यांच्या बँक खात्याचा किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड ओटीपी कोणी विचारत असेल तर हा सर्व प्रकार सायबर गुन्ह्यामध्ये येतो.
सायबर गुन्हेगाराच्या निशाण्यावर कोण असतो?
सर्वात जास्त सायबर गुन्हे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या लोभांच्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यामध्ये बँक लोन, इन्शुरन्स, शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी विकणे आहे या माध्यमातून फसव्या जाहिराती केल्या जातात. सोशल मीडियावर असल्या जाहिराती बघून (Cyber Crime) सायबर गुन्हेगाराचे शिकार युजर्स बनले जातात.
सरकारच्या माध्यमातून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की असल्या जाहिराती वर विश्वास ठेवू नका. आजच्या घडीला सायंबर गुन्हेगार ब्लॅकमेलिंगच्या ( blackmail ) नवीन – नवीन पद्धती वापरत आहेत. ते डीप फेक व्हिडिओ आणि फोटो वापरून लोकांना फसवत आहेत. सध्या असल्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. भारताचा स्टार माझी क्रिकेटर ” सचिन तेंडुलकर “ ने ही डीप फेक फ्रॉड संबंधित “मुंबई सायबर पोलिसात ” आपली तक्रार दिली आहे. “सचिन तेंडुलकर” यांचा फोटो वापरून सायबर गुन्हेगार ( cyber crime ) लोकांना निशाणा बनवत होत.
AI टेक्नॉलॉजी नागरिकांसाठी धोक्याची बनली आहे का?
सध्या आयटी सत्रामध्ये AI टेक्नॉलॉजीचा (Artificial Intelligence) वेगाने वापर केला जात आहे. त्यातच आता या टेक्नॉलॉजी सायबर गुन्ह्यात ही वापरण्यास सुरुवात झाली आहे. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कोणाचाही “फोटो , व्हिडिओ आणि आवाज ” हुबेहूब निर्माण केला जाऊ शकतो. याच्या माध्यमातून सहज सायबर गुन्हेगार कोणालाही “ब्लॅकमेल” करू शकतो.., त्याच्या कडून हवी असणारी रक्कम वसूल करू शकतो. AI टेक्नॉलॉजी मार्फत होणारे सायबर गुन्हे ( cyber crime ) हे सरकार पुढील चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्यांनी हे अभियान राबवले आहे त्यामध्ये ते नागरिकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सांगत आहेत की- ” लालच का शिकार मत बनो.., और घोटाळे बाज से सुरक्षित रहो!
हे पण वाचा :Realme12X 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च ; 45W फास्ट चार्जर सह 10999 रू किंमती पासून ग्राहकांना मिळणार!
हे पण वाचा: FasTag new update; 01 एप्रिल-2024 पासून एक वाहन एक FAST TAG सुविधा सुरू!
सायबर गुन्ह्यागारापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे?
सायबर गुन्हा (cyber crime) टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नागरिकांनी सतत लक्षात ठेवाव्यात.
- अज्ञात संदेश किंवा वेबसाईट उघडणे टाळावे.
- सोशल मीडियाद्वारे पाठवलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे.
- स्वतःचा मोबाईल अज्ञान व्यक्तीकडे देऊ नये.
- नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यांचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा.
- मोबाईल पासवर्ड शक्यतो दुसऱ्यांना सांगू नये.
हे सर्व करून ही जर तुम्ही सायबर गुन्ह्याला (cyber crime) बळी पडला तर काय उपाय करावे.? भारत सरकार द्वारे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी 1930 हा हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे. त्याशिवाय www.cybercrime.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून आपली तक्रार नागरिक नोंदवू शकतात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी “प्रशासन आणि पोलीस” सातत्याने प्रयत्न करत आहेत.” पोलिसामार्फत” मोठ्या प्रमाणात जनजागृती करून गुन्हेगारावर कारवाही पण करण्यात येत आहे.
सायबर गुन्ह्याची (cyber crime) चेतावणी गांभीर्याने का घ्यायला पाहिजे?
बहुतेक लोक मोबाईलद्वारे सोशल मीडिया वापरतात.. अशा परिस्थितीत सहजपणे सोशल मीडिया द्वारे नागरिकांना लक्ष बनवले जाऊ शकते, गुन्हेगार त्यांच्या मोबाईलच नंबरचा सहज एक्सेस घेतात. त्यांच्या थोड्याशा चुकीमुळे गुन्हेगार संपूर्ण मोबाईलचा ताबा घेऊ शकतो.., त्यांच्या मोबाईलची सर्व सुरक्षा भंग होऊ शकते.., काही क्षणातच बँक खाते त्यांच्या डोळ्यासमोर रिकामे होते.., आणि त्यांचे फोटो व्हिडिओ सहज लिंक होतात.