Vodafone Idea FPO : वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी 10 आणि 11 रुपये किंमतीच्या बँडवर (FPO) च्या माध्यमातून उभारणार 18000 कोटीचा निधी!

Vodafone Idea FPO : तोट्यात चाललेल्या दूर संचारच्या सेवामुळे  वडाफोन आयडिया सतत काही वर्षापासून चर्चेत आहे. कंपनीने सप्टेंबर 2020 मध्येच भांडवली निधी उभारण्याची योजना जाहीर केली होती.  वोडाफोन आयडिया ( VI ) ने “ओरियाना इन्व्हेस्टमेंटला” 2075 कोटीं किंमतीचे शेअर्स वाटप मंजुरी दिली आहे. वोडाफोन आयडिया कंपनीचा गुंतवणूकदाराकडून वीस हजार कोटी इक्विटी निधी उभारण्याचा उपक्रम आहे. 

त्यासाठी लवकरच ( Vodafone Idea FPO) कंपनी पुढील आठवड्यात 18000 कोटी किंमतीचे एफ पी ओ शेअर मार्केट मध्ये आणणार आहे. त्यामध्ये 50% शेअर्स हे संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत तर ते 30 ते 35 % शेअर्स सामान्य किरकोळ गुंतवणूकदारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सामान्य गुंतवणूकदाराला 1298 शेअर्स च्या लॉट साईज मध्ये बोली लावावी लागणार आहे.

फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) म्हणजे काय?

शेअर बाजारात आधीपासूनच सूचीबद्ध असणारी कंपनी  भागधारकांकडून किंवा गुंतवणूकदाराकडून त्यांना नवीन शेअर्स उपलब्ध करून त्यांच्यामार्फत भांडवल उभा केले जाते त्याला फॉलोऑन पब्लिक ऑफर ( FPO ) असे म्हणतात. जर भविष्यात  एखाद्या कंपनीला निधीची कमतरता असेल तर कंपनी फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) माध्यमातूनच निधी उभा करते.

कंपन्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) माध्यमातून भांडवल का गोळा करतात?

कंपनीचे मुख्य दोनच उद्देश असतात….फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO)  मार्फत भांडवल गोळा करण्याचे.

  • कंपनीवर असणारे कर्ज कमी करणे 
  • कंपनीच्या इक्विटी मध्ये वाढ करणे

Vodafone Idea FPO : lot Size काय आहे?

वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूकदाराला एक लॉट शेअर्स साठी किमान गुंतवणूक 14278 रुपये करावी लागणार आहे. तर कमीत कमी बोली 1,298 शेअर्स साठी लावता येणार आहे. त्यापेक्षा जास्तीची शेअर्स साठी गुंतवणूकदाराला 1,298 शेअर्सच्या पटीत बोली लावावी लागणार आहे.

 

Vodafone Idea FPO
Image source: x social media

Vodafone Idea FPO : बँड ची किंमत काय आहे?

वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने FPO 10 आणि 11 रुपये प्रति शेअर्स च्या दरम्यान किंमत निश्चित केली आहे. यामधून कंपनी 18000 कोटी रुपयांचे भांडवलाची निर्मिती करणार आहे.


हे पण वाचा: Bharti hexacom IPO ; भारती हेक्साकॉम कंपनी 12 एप्रिल ला मार्केटमध्ये झाली लिस्टिंग ! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदाराला केले मालामाल.!


Vodafone Idea FPO चा कालावधी!

या FPO चा कालावधी 18 एप्रिल ला सुरू होत असून 22 एप्रिल पर्यंत उघडा राहणार आहे. यादरम्यानच गुंतवणूकदार किंवा भागधारक वडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी च्या शेअर्समध्ये नव्याने गुंतवणूक करू शकणार आहेत.

वोडाफोन आयडिया लिमिटेड ( FPO ) माहिती तपशील:

घोषणा ₹18,000-कोटींची  (FPO)

उद्दिष्टे – 4G आणि 5G अधिक स्थिती सुधारण्यासाठी

FPO कालावधी एप्रिल 18- एप्रिल 22

प्रत्येकी किंमत 10-11 प्रति शेअर्स

किंमती बँड 1298 इक्विटी शेअर्स

          हा इक्विटी निधी उभारणी पूर्ण केल्यानंतर वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने 45000 कोटी रुपये निधी मिळवण्यासाठी कर्ज उभारण्याची योजना आखली आहे. येणाऱ्या दोन महिन्यात हा निधी उभारणीचं काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

 

 

 

Scroll to Top