Varyaa Creation LTD, Shivam Chemical Ltd, Emmforce Autotech या कंपनीच्या IPO नंतर आता एप्रिल शेवट मध्ये नवीन दोन कंपनीचे IPO मार्केटमध्ये येत आहेत. Racks & Rollers IPO आणि Amkay Products IPO येणाऱ्या 30 एप्रिल 2024 ला गुंतवणूकदारासाठी खुले होणार आहेत. Racks & Rollers कंपनी स्टोरेज टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन चा बिझनेस करते. स्टोरेज रँक, ऑटमेटेड वेअर हाऊस, आणि इतर स्टोरेज सोल्युशनच्या उत्पादन आणि सेवा देण्याचे काम Racks & Rollers Ltd कंपनी करते.
तर Amkay Products Ltd ही कंपनी वैद्यकीय क्षेत्रातील हेल्थकेअर सेंटर, हॉस्पिटल व क्लीनिक मध्ये वापरले जाणारे फेस मास्क, अल्कोहोल स्वॅब्स, लॅन्सेट नीडल्स, नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर, सर्जन कॅप्स इत्यादी वैद्यकीय उपकरणाचे Manufacturing आणि Marketing या कंपनीद्वारे भारतातील विविध क्षेत्रांमध्ये केले जाते.
महत्त्वाची माहिती
Racks & Rollers IPO Details:
रॅक अँड रोलर्स कंपनीने त्यांच्या Racks & Rollers IPO तारीख निश्चित केली आहे. हा IPO 30 एप्रिल रोजी उघडेल आणि तर 03 मे रोजी बंद होणार आहे. कंपनी या IPO द्वारे 29.95 कोटी रुपयाची उभारणी करणार आहे. या Racks & Rollers IPO ची Face Value 10 रुपये प्रति इक्विटी शेअर्स असणार आहे. IPO च्या माध्यमातून कंपनीचे 3,840,000 नवीन इक्विटी शेअर्स BSE SME बोर्डवर सूचीबद्ध होणार आहेत.
Racks & Rollers IPO ची किंमत आणि लॉट साइज काय आहे!
या IPO ची किंमत बँड 73 ते 78 रुपयाच्या दरम्यान प्रति शेअर्स निश्चित करण्यात आली आहे. आणि लॉट साइज 1600 शेअर्स चा आहे. म्हणजे एका लॉट साठी गुंतवणूकदाराला कमीत कमी 124,800 रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे.
Racks & Rollers IPO Dates,Allotment कधीपर्यंत होऊ शकते?
गुंतवणूकदाराला या IPO मध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवार 30 एप्रिल ते शुक्रवार 03 मे 2024 चा कालावधी निश्चित केलेला आहे. आणि Racks & Rollers Ipo Allotment 06 मे ला होईल. त्याचबरोबर ज्यांना या आयपीओ मध्ये सहभागी होता आले नाही त्यांचा refund 07 तारखेला होईल व (Racks & Rollers IPO Listing Date) BSE SME मार्केटमध्ये कंपनी 08 तारखेला आपले शेअर्स लिस्टिंग करण्याची शक्यता आहे.
Amkay Products IPO Details:
Amkay Products IPO तारीख पण 30 एप्रिल ते तीन मे च्या दरम्यानच असणार आहे. या ipo च्या माध्यमातून कंपनी अंदाजे 12.61 कोटी रुपये जमा करणार आहे.तर face value दहा रुपये प्रति इक्विटी शेअर्स असून 2,292,000 नवीन प्रति इक्विटी शेअर्स Amkay Products IPO च्या माध्यमातून BSE SME मार्केटमध्ये आणणार आहे.
Amkay Products IPO ची किंमत आणि लॉट साइज
Amkay Products IPO Price Band: या कंपनीने त्यांच्या IPO ची किंमत बँड 52 ते 55 रुपये प्रति शेअर्स असणार आहे. आणि एका लॉट साईज मध्ये 2000 शेअर्स आहेत. या IPO मध्ये सहभागी होण्यासाठी 110,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे.
Amkay Products IPO Dates,Allotment कधीपर्यंत होऊ शकते?
Amkay Products IPO ची पण Allotment…. Racks & Rollers IPO प्रमाणेच आहे. 30 एप्रिल ते 03 च्या दरम्यान गुंतवणूकदाराला सहभागासाठी हा IPO खुला राहणार आहे. Amkay Products IPO Allotment 06 मे ला तर लिस्टिंग BSE SME मार्केटमध्ये 08 ला होण्याची शक्यता आहे. Amkay Products IPO Listing . ज्यांना या IPO मध्ये सहभागी होता आले नाही, त्यांचा रिफंड Refund 07 मे ला मिळू शकतो.
Racks & Rollers IPO आणि Amkay Products IPO मध्ये सहभागी कसे व्हावे
इंटरनेट बँकिंग, UPI आणि डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून. गुंतवणूकदाराला या IPO मध्ये सहभागी होता येईल. त्याचप्रमाणे BSE च्या वेबसाईटवरून दोन्ही IPO फॉर्म डाऊनलोड करून. त्याचे पेमेंट बँक किंवा ब्रोकर मार्फत केले जाऊ शकते.
(टीप– या post द्वारे आम्ही कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत… शेअर बाजार किंवा आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)