line of credit! “लाईन ऑफ क्रेडिट”पर्याय बँकांच्या कर्जाला उपलब्ध झाला आहे काय? जाणून घ्या कोणती बँक ही सुविधा 2024 मध्ये देत आहे!

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका वेगवेगळ्या नवीन योजना घेऊन येत असतात. त्यातच आता पर्सनल लोन personal loan ला पर्याय म्हणून लाईन ऑफ क्रेडिट ही नवीन पद्धत सुरू झालेली आहे. ही पद्धत LINE OF CREDIT काही मोजक्याच बँका व वित्तीय संस्था काही ठराविक शहरांमध्ये त्यांच्या ग्राहकांना देत आहेत. Personal loan देण्यासाठी बँकांना काही मर्यादा असतात. बँका विशिष्ट रकमेच्या खाली कर्ज देत नाहीत त्यामुळे ग्राहकांना आवश्यकता नसली तरीही तेवढ्या रकमेचे कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे कर्जदाराला अनावश्यक व्याजाची परतफेड करावी लागते.

उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला केवळ 20,000 रुपये कर्जाची आवश्यकता असेल पण बँकाची कर्जाची कमीत कमी 50,000 रुपये मर्यादा असेल. तर 30,000 रुपये अनावश्यक कर्ज त्या व्यक्तीला घेण्याचे बंधन कारक असते. जरी त्या व्यक्तीने कर्जामधील काही रक्कमेचा च भाग वापरला असला… तरी त्या व्यक्तीला संपूर्ण रक्कमेवर व्याज आकारले जाते. यामुळे त्या व्यक्तीला अतिरिक्त व्याज बँकांना द्यावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही बँका व वित्तीय संस्था सोपा पर्याय निर्माण केला आहे. त्याला आपण लाईन ऑफ क्रेडिट (Line Of Credit) म्हणून ओळखतो.

line of credit म्हणजे काय?

ज्या व्यक्तीने बँकेकडे लाईन ऑफ क्रेडिट साठी अर्ज केला आहे अशा व्यक्तींना बँका किंवा वित्तीय संस्था ०१ लाखापासून १० लाखापर्यंत लाईन ऑफ क्रेडिट त्यांच्या मोबाईल बँकिंगच्या ॲप मध्ये उपलब्ध करून देतात. एकदा का कर्जाची रक्कम मंजूर झाली.. की तो व्यक्ती आवश्यकतेनुसार त्या एकूण रकमेतून काही रक्कम काढतो व त्याचा वापर करतो. उर्वरित रक्कम तसेच बँकेमध्ये ठेवतो. त्या व्यक्तीला व्याज फक्त केवळ त्याने वापरलेल्या रक्कमेलाच आकारले जाते. यामुळे त्या व्यक्तीला मासिक उत्पन्नाला परवडेल असाच EMI बँकेला द्यावा लागतो.

Line of credit वर कमीत कमी व्याज आकारले जाते. आणि याचा वापर क्रेडिट कार्ड सारखाच केला जातो. समजा बँकेने आपल्याला १ लाख रुपये ची क्रेडिट लाईन मंजूर केली आहे त्यामधून आपण फक्त १०,००० रुपये वापरले तर व्याज आपल्याला फक्त त्या १०,००० रुपयालाच द्यावे लागेल. यामुळे आपल्याला कर्ज परतफेड करणे अगदी सोपे होते ..कारण आपल्याला आवश्यक असणारा परतफेडीचा कालावधी आपण निवडू शकतो. आणि त्यानुसार व्याजासह रक्कम सहज परतफेड केली जाऊ शकते.

line of credit loan ची आवश्यकता का आहे?

लाईन ऑफ क्रेडिट (line of credit) ज्या व्यक्तीचे अस्थिर मासिक उत्पादन आहे किंवा एखादा व्यक्ती स्वयंरोजगार असलेला व्यवसाय करतो. त्यासाठी लाईन ऑफ क्रेडिट हे खूप फायद्याचे राहू शकते. कमी उत्पादन असल्यामुळे बँका किंवा वित्तीय संस्था त्यांना लवकर कर्ज देत नाहीत. या व्यक्तींना वर्षभर पैशाची आवश्यकता असते त्यामुळे त्यांना सतत कर्ज घ्यावे लागतात. यामुळे कर्जाच्या फिस किंवा टॅक्स शुल्का मध्ये विनाकारण वाढ होते याचा फटका कर्जदाराला बसतो.

लाईन ऑफ क्रेडिट मध्ये एकदा का कर्जाची रक्कम मंजूर झाली की कोणत्याही प्रकारचे टॅक्स किंवा अतिरिक्त शुल्क लागत नाहीत. जेवढे रक्कम वापरण्यात आली आहे तेवढ्यासाठीच ते शुल्क लावले जातात. त्यामुळे लाईन ऑफ क्रेडिटचा पर्याय चांगला समजण्यात येत आहे.

(Line of credit) लाईन ऑफ क्रेडिट चे फायदे

तुम्हाला जर क्रेडिट लाईन मधून जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर.. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पैशाचे योग्य नियोजन करा. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कर्ज घेतले आहे आणि ते व्याजासह परत करायचे आहे. तुम्हाला लाईन ऑफ क्रेडिट चे फायदे खालील प्रमाणे होऊ शकतात.

  • लाईन ऑफ क्रेडिट चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जेवढे रक्कम वापरली आहे त्या रक्कमेलाच व्याज लागते.
  • एकूण मंजूर रक्कमेतून केव्हाही कधीही पैसे काढण्याची सुविधा असते.
  • वैयक्तिक खर्च, दैनंदिन गरज, मेडिकल इमर्जन्सी व इतर कारणांसाठी लवकर पैसे उपलब्ध होतात.
  • सर्वसाधारण कर्जापेक्षा लाईन ऑफ क्रेडिट मध्ये व्याजदर कमी असतो.
  • बँका किंवा वित्तीय संस्था कडे कुठलेही तारण ठेवण्याची गरज नसते.
  • कर्ज परतफेडीसाठी EMI मासिक पर्याय उपलब्ध असतो.
  • लाईन ऑफ क्रेडिट वापरण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क किंवा टॅक्स भरावा लागत नाही.
  • credit score सुधारण्यास मदत मिळते.

(Line of credit)लाईन ऑफ क्रेडिट घेण्यासाठी पात्रता काय आहे?

  • लाईन ऑफ क्रेडिट घेण्यासाठी कर्जदाराचे बँक खाते शक्यतो त्याच बँकेत असावे लागते.
  • कर्जदार बँकेचा नियमित ग्राहक असावा लागतो.
  • लाईन ऑफ क्रेडिट घेण्यासाठी कर्जदाराचा Credit Score 750 पेक्षा जास्त असावा लागतो.
  • कर्जदाराचे लाईन ऑफ क्रेडिट साठी ठराविक मासिक उत्पन्न असावे लागते.

Personal loan साठी Bank line of credit पर्याय आहे का?

Personal loan साठी Bank line of credit पर्याय आहे का? तर नक्कीच असू शकतो. Personal loan मिळवण्यासाठी बँकांचे वेगवेगळे नियम व अटी शर्ती असतात शिवाय काही महत्त्वाच्या कागदपत्राची ही पूर्तता करावी लागते… तसेच तारण म्हणून काही जमीन किंवा सोने (Gold) वस्तूच्या स्वरूपात लोन साठी बँकांकडे ठेवावे लागते. यामुळे सतत अडचणी निर्माण होतात व मासिक त्रास उद्भवतो….. शिवाय क्रेडिट स्कोर (Cridit Score) ही चांगला असेल तरच Personal Loan बँक देतात.

पण लाईन ऑफ क्रेडिट मध्ये कर्जदार एकदा का पात्र झाला… की बँकाकडे किंवा वित्तीय संस्था कडे कुठल्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नसते. यामुळे कर्जदार लाईन ऑफ क्रेडिट ला अधिक पसंती देत आहेत.

Best Line Of Credit देणाऱ्या बँका कोणत्या आहेत !

सध्या काही मोजकाच बँकांनी व वित्तीय संस्थाने लाईन ऑफ क्रेडिट (LINE OF CREDIT) सेवा देण्याची सुरुवात केली आहे. यामध्ये काही कॉर्पोरेटिव बँकाचाही समावेश आहे. जवळपास सर्वच बँका भविष्यात आपल्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन लाईव्ह ऑफ क्रेडिट सेवा देण्याचा प्रयत्न करतील. काही महत्त्वाच्या लाईन ऑफ क्रेडिट सेवा देणारा बँका पुढील प्रमाणे आहेत.!

Indusind bank

IndusInd Bank ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन एक प्रॉडक्ट INDEI APP नावाने लॉन्च केले आहे. INDIE’s My Credit Line मार्फत INDUSIND BANK पाच लाखापर्यंत क्रेडिट लाईन ची सेवा देते. त्याचबरोबर एक ते 36 महिना पर्यंतचा लवचिक परतफेडीचा कालावधी EMI भरण्याची सुविधा उपलब्ध करून बँकेने दिली आहे…….

Indusind bank चे Line Of Credit सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा

youtube.com/@nkdigitalpoint

IDFC FIRST BANK

IDFC FIRST BANK मध्ये लाईन ऑफ क्रेडिट दहा लाखापर्यंत मिळते.. यावर ग्राहकांना वार्षिक व्याजदर 10.75 ते 30 % पर्यंत आकारला जात आहे ..ही सेवा First Money smart personal loan या नावाने IDFC FIRST BANK देत आहे.

IDFC FIRST BANK मध्ये लाईन ऑफ क्रेडिट परतफडीचा कालावधी दोन महिन्यापासून साठ महिना पर्यंत आहे.

Artel Bank

Artel बँक फक्त आपल्या एअरटेल युजर साठीच ही सेवा देते यामध्ये लाईन ऑफ क्रेडिट नऊ लाखापर्यंत मिळते.. अगदी कमी व्याजदर व क्रेडिट स्कोर कमी असला तरीही जर तुम्ही एअरटेल चे नियमित ग्राहक असाल तर तुम्हाला लवकर लाईन ऑफ क्रेडिट मिळू शकते.

Bank line of credit Rep payment (परतफेड) कशी करावी?

लाईन ऑफ क्रेडिट मध्ये ही परतफेडीचा कालावधी बँकामार्फत लवचिकच देण्यात येतो… ज्या पद्धतीने ग्राहक क्रेडिट कार्ड किंवा वेगवेगळ्या Loan चे EMI माध्यमातून ऑनलाईन Repayment करतात त्याच पद्धतीने लाईन ऑफ क्रेडिटचे ही Repayment प्रत्येक महिन्याला केले जाते.

लाईन ऑफ क्रेडिट (line of credit) फायदा कसा केला जाऊ शकतो !

ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न स्रोत अस्थिर किंवा कमी आहे अशा लोकांचे जीवन सुधारण्यात लाईन ऑफ क्रेडिट महत्त्वाची भूमिका बजाऊ शकते. दैनंदिन लागणारा खर्च मुलांचे शिक्षण घरबांधणी किंवा कुटुंबातील विवाह सारखे छोटे मोठे कार्यक्रम या परिस्थितीत लागणारी आवश्यक रक्कम अनिश्चित असते. कर्जदाराला ही रक्कम ठरवणे कठीण होते. अशा परिस्थितीत जर कर्जदाराकडे लाईन ऑफ क्रेडिट ची सुविधा उपलब्ध असेल तर तो आवश्यक असणारी रक्कम त्या क्रेडिट लाईन मधून भागवू शकतो.

थोडक्यात लाईन ऑफ क्रेडिट ही एक कर्ज प्रणाली आहे… तिचा योग्य वापर केला तर तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत होऊ शकते.

टीप:- या Post मध्ये दिलेली माहिती अंतिम नाही.. भविष्यात बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या अटी/ शर्ती व नियमात किंवा व्याज दारात तसेच पात्रते ही बद्दल केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी..!

Scroll to Top