12 April
Bharti-Hexacom-Ipo-भारती-हेक्साकॉम-कंपनी
Maha Digital News :Bharti hexacom IPO कंपनीचा आयपीओ तीन एप्रिल ते पाच एप्रिल च्या दरम्यान मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतात, या IPO ला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. Bharti hexacom कंपनी कडून 4.12 करोड शेअरची ऑफर करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात मात्र 123 करोड शेअर्सची गुंतवणूकदाराकडून बोली लावण्यात आली.
शुक्रवारी 12 एप्रिल ला सकाळी दहा भारती हेक्साकॉम कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड झाली. ही एक भारतीय एअरटेल ची उप कंपन आहे ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये दूरसंचार मंडळांना सेवा देण्याचे या कंपनीमार्फत चालते. त्यामध्ये राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांचा समावेश होतो. फिक्स्ड-लाइन फोन व्यतिरिक्त कंपनी ब्रांड बँड सेवाही प्रदान करते.
पहिल्याच दिवशी Bharti hexacom कंपनीच्या गुंतवणूकदाराला केले मालामाल.
काही वित्तीय संस्था व काही तज्ञांच्या मते कंपनी पहिल्या दिवशी दहा टक्के पर्यंत गुंतवणूकदाराला नफा देऊ शकते असा अंदाज लावला होता. पण मात्र कंपनीने प्रत्यक्षात त्यांना चुकीचे ठरवून पहिल्याच दिवशी सकाळी 12 पर्यंत 47% पर्यंत नफा गुंतवणूकदाराला मिळवून दिला, त्यामुळे ते मालामाल झाले. भारती हेक्साकॉम IPO ची शेवटची मूळ किंमत 570 असताना पहिल्या तीन तासांमध्येच कंपनीच्या शेअर्समध्ये 831 (47%) रुपयाने वाढ पाहायल मिळाली. त्यामुळे जा गुंतवणूकदाराला या भारती हेक्साकॉम IPO मध्ये सहभागी होता आले त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आज नक्कीच मोठ्या प्रमाणात नफा दिसत असेल.
हे पण वाचा: Nifty, Sensex Close At Record Highs: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी Nifty 50 आणि sensex मध्ये विक्रमी वाढ..!
हे पण वाचा: New FD Rates : बँकांच्या नवीन Fd दरानुसार आता तुम्हाला किती होणार फायदा..! हे माहित आहे का?
हे पण वाचा: Realme12X 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च ; 45W फास्ट चार्जर सह 10999 रू किंमती पासून ग्राहकांना मिळणार!
पहिल्या सत्रात भारती हेक्साकॉम ( Bharti hexacom ) कंपनीची स्थिती कशी होती?
शुक्रवारी सकाळी दहा वाजता कंपनीचा शेअर्स Nse व Bse च्या दोन्ही मार्केटमध्ये ओपन 755 रू किंमतीला झाला. पहिल्या दोन तासातच कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी खरेदी झाली की 800 रू किंमत शेअरने सहज पार केली. तर शेअर्सला Lower circuit 604 रुपये आणि high circuit 906 रुपये लागला होता.
दुपारी एक वाजेपर्यंत भारती हेक्साकॉम कंपनीच्या शेअर्सने 880 रुपयाचा high देऊन 822 वर ट्रेड करत होता. पहिल्याच दिवशी कंपनीत जोरदार खरेदी होत आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच भारती हेक्साकॉम कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज लावला जात आहे.