Dr.Ambedkar jayanti 2024: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती:
14 एप्रिल हा दिवस भारतीय राज्यघटनेचे जनक “डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. भेदभाव नष्ट करण्याचा त्यांचा समर्पणाचा सन्मान म्हणून 14 एप्रिल हा दिवस “समता दिन” म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी त्यांची 134 वी जयंती आहे. जगभरात व संपूर्ण देशात ती एक आंबेडकर जयंती म्हणून साजरी केली जाते. 14 एप्रिल 1891 रोजी जन्माले आंबेडकर ते केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते; तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, एक समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ होते.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी” आपले जीवन अस्पृश्यांवरील भेदभाव नष्ट करण्यासाठी , कामगारांच हक्कासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी समर्पित केले म्हणून त्यांचा हा दिवस “समता दिवस” म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल या दिवसाची सुरुवातच संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून त्यांच्या पुतळ्याची मिरवणूका आणि सामुदायिक कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सारांश!
समानतेचे पालन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक भेदभावा विरुद्ध आणि अत्याचारी त जातीच्या हक्कासाठी त्यांनी केलेले समर्थन भारतातील सामाजिक सुधारणांना आकार देण्यासाठी महत्त्वाचे ठरले. भेदभाव मुक्त समाजाच्या दृष्टीला चालना देण्यासाठी देशात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची जयंती साजरी केली जाते.
शिक्षणाचे पुरस्कर्ते: सामाजिक आणि आर्थिक गतिशीलतेला प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे असा ठाम विश्वास डॉ.आंबेडकरांचा होता. त्यासाठीच त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज ची स्थापना केली होती.
जागतिक विद्वान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली लेखनासह जात आणि विषमतेच्या भारतातील समस्यावर गोलमेज परिषदेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले. त्यांचे आर्थिक सामाजिक व देश हिताचे योगदान जागतिक पातळीवर आज मान्य केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती प्रगतीची प्रेरणा आणि न्यायी समाजाच्या निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील राहावी हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली.