राष्ट्रीय महामार्ग प्रवास करताना आपल्याला टॅक्स भरावा लागतो. त्याला वाहनावरील टोल म्हणून ओळखले जाते. टोल नाक्यावरील वाहनाची गर्दी कमी करणे व जास्त वेळ थांबावा लागू नये ट्राफिक व्यवस्था सोडवण्यासाठी ही FasTag सुविधा सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिल पासून यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
एक वाहन एक FASTAG लागू करणारे संस्था!
नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासू एन एच ए आय या ( NHAI )संस्थेकडून याची अंमलबजावणी करण्यात आली. पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध आल्याने काही ग्राहकांना FasTag वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ( NHAI ) या संस्थेने एक वाहन एक फास्ट टॅग ( one vehicle one FasTag ) उपक्रम अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली होती.
यापूर्वी काही फास्ट टॅग युजर्स एकापेक्षा जास्त फास्ट टॅगचा( FasTag ) वापर करायची. त्यांना या नियमामुळे आता आळा बसणार आहे. यापुढे आता एक वाहन एक फास्ट टॅगच (one vehicle one FasTg) वापरता येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण :
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील आणि दुर्दगती मार्गावर टोल टॅक्स वस्तू केला जातो. या टोलचे संकलन प्रणाली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने चालवली जाते. 1 एप्रिल 2024 पासून एक वाहन एक FasTag ला करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे.
FasTag म्हणजे काय?
रोख पैशाचे टोल नाक्यावर व्यवहार न करता एक डिजिटल स्वरूपातील स्टिकर वाहनांच्या काच समोर लावले जाते. RFID तंत्रज्ञानाच्या मदतीने स्टिकर मधून टोल भरला जातो. टोल भरणाऱ्या व्यक्तीची रक्कम टाकला जोडलेल्या प्रीपेड अकाउंट किंवा बँक अकाउंट मधून कापली जाते.