New FD Rates : बँकांच्या नवीन Fd दरानुसार आता तुम्हाला किती होणार फायदा :
गुंतवणूकदाराचे Fd अर्थातच (मुद्त ठेव योजना) लोकप्रिय माध्यम राहिली आहे. या योजने अंतर्गत निश्चित पर्तव्यासह सुरक्षिततेची हमी बँका मार्फत गुंतवणूकदाराला मिळत असते. सध्या विविध बँका त्यांच्या एफडी योजना वर आकर्षक व्याज दर देत आहेत. या योजनेबाबत सांगायचं झालं तर नेहमीच सरकारी बँका व खाजगी बँका यांच्या व्याजदराची तुलना केली जाते. ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्गांसाठी Fd कमी जोखीम असलेला मार्ग म्हणून ओळखला जातो. 01 एप्रिल 2024 पासून काही बँकांनी एक ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी 8% पर्यंत व्याजदर जाहीर केले आहेत.
(मुदत ठेव) Fd योजनेचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये :
- बचत खात्याच्या तुलनेत Fd खात्यात बँका मार्फत व्याजदर चांगला मिळतो.
- अल्पवयीन पासून जेष्ठ नागरिकांपर्यंत भारतातील सर्व व्यक्ती FD खाते उघडण्यासाठी पात्र असतात.
- Fd खातेदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातील दोन सदस्य ( nominee) Fd मधील रक्कम प्राप्त करण्यासाठी पात्र असतात.
- आपत्कालीन परिस्थितीत मुदतीपूर्व Fd खात्यातील रक्कम प्राप्त केली जाऊ शकते.
- बँका Fd साठी स्वीपिंग सुविधा उपलब्ध करून देतात, ज्यामुळे ठेवीदाराला त्यांच्या बचत खात्याशी Fd खाते लिंक करता येते.
हे पण वाचा :- FasTag new update; 01 एप्रिल-2024 पासून एक वाहन एक FAST TAG सुविधा सुरू!
भारतातील बँकांचे 2024 पर्यंतचे Fd दर
ज्येष्ठ नागरिकांसाठी New FD Rates चे दर :
Fd खाते उघडण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे. त्यावर साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणे आवश्यक आहे. जवळपास सर्वच बँकांमध्ये Fd खात्याचा कालावधी सात दिवसापासून दहा वर्षापर्यंत असतो. सामान्यता ; बँकाद्वारे दिले जाणारे सामान्य लोकांना व्याजदर व ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणाऱ्या व्याजदरात किरकोळ फरक असतो. ज्येष्ठ नागरिकांचा Fd खात्याचा दर 0.25% ते 0.75 % ने सर्वसामान्य Fd खातेदारापेक्षा जास्त असतो.