08 APRIL 2024
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात volatility मध्ये वाढ झाली आहे. आज nifty 50 index आणि BSE sensex मध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली. आतापर्यंतच्या उंच्चाका मधील ही सर्वात मोठी वाढ आहे. जागतिक बाजारातील कल आणि Large Cap Stock व रिलायन्स इंडस्ट्री च्या शेअर्समध्ये दिवसभर तेजी मुळे sensex 495 point वाढून 74742.50 वर पोहोचला . तर Nifty 50 मध्ये 152.60 point वाढून आतापर्यंतच्या सर्वात 22695 High point पोचला आहे. तर बँक निफ्टीनेही ( BANKNIFTY ) आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांक गाठून आतापर्यंतचे 48700 point प्रथमच पातळी ओलांडली आहे. NIFTY 50 इंडेक्स मधील प्रमुख असणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या खरेदीमुळे इक्विटी मध्येही तेजी आली. Bse sensex दिवसभराच्या व्यवहारानंतर 74742.50 point च्या नव्या शिखरावर बंद झाला. त्यामध्ये 621 point ची वाढ पाहायला मिळाली. sensex ने intraday high 74869.30 विक्रमी उंचांकावर पोहोचलेला आहे. तर NIFTY 50 मध्येही 22695.30 point चा आतापर्यंतचा सर्वात जास्त उंचांक आहे.
Sensex index मध्ये M&M, Maruti, NTPC, JSW STEEL, Reliance industry. Axis Bank व power guard या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली. या आठवड्यातील ईद – अल – फित्र सणानिमित्त गुरुवारी बाजार बंद राहणार आहे. तज्ञाच्या मते, रुपया आणि डॉलर चलनाच्या चढउतारामध्ये आणि कच्च्या तेलातील अनियमित किंमतीच्या परिणाम आजच्या बाजारावर दिसून आला. भारतीय कंपन्या या आठवड्यात FY24 च्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. तसेच भारतीय उत्पादन औद्योगिक डेटा देखील 12 एप्रिल 2024 रोजी जाहीर केला जाईल आणि त्याच दिवशी मार्च चा महागाई दर पण जाहीर केला जाईल.
हे पण वाचा : New FD Rates : बँकांच्या नवीन Fd दरानुसार आता तुम्हाला किती होणार फायदा..! हे माहित आहे का?
मागील आठवड्यात पण निफ्टी-50 इंडेक्स मध्ये व sensex मध्ये अशा प्रकारचेच वाढ पाहायला मिळाली होती , तोच ट्रेंड पुढे चालू आहे. कंपन्यांच्या तीमाही निकालामुळे शेअर बाजाराचा ट्रेंड व जागतिक बाजारचा ट्रेन बदललेला पाहायला मिळत आहे.