Rahul Gandhi Income..! राहुल गांधी यांचे गेल्या 5 वर्षातील उत्पन्न 6 कोटी रुपये, त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती..! ते एक खरंच सफल गुंतवणूकदार आहेत का.?

10 April 2024

खरंच…राहुल गांधी एक सफल गुंतवणूकदार आहेत का…? त्यांच्यासाठीच हा आजचा लेख आहे.. गुंतवणूकदार कोण असतो ? जो आपल्या पैशाची गुंतवणूक करतो.., कुठे करतो., शेअर्स मार्केट मध्ये करतो.., म्युचल फंड( MUTUAL FUND )..,( GOLD ) गोल्ड किंवा जमीन प्रॉपर्टी खरेदी करतो.., जसं की स्वतःच्या बँक खात्यावर पैसे न ठेवता.., कोणी व्यक्ती त्या पैशाची गुंतवणूक कुठे करत असेल…, आणि तो पैसाही पैसा कमवत असेल तर त्याला गुंतवणूक असे म्हणतात… काही वेळेस पैसा- पैसा कमवण्याच्या ऐवजी कधी नुकसान ही करतो.. हाच मार्केट चा नियम आहे .

विषय आहे (Rahul Gandhi) राहुल गांधींचा नफा झाला की तोटा झाला… त्यांनी आपला पैसा कुठे- कुठे गुंतवला…, याची चर्चा तर देशात होणारच .. तुमच्या डोक्यात एक विचार तर आलाच असेल…, कधी ही पैसा गुंतवणूक केला जात असेल तर.. तो शेअर्स मार्केटच्या मार्फतच केला जातो.  शेअर मार्केट साठी ” बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE ) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ( NSE) ” भारतात मार्केट बनले आहेत..  सोप्या भाषेत समजायचं झालं.. तर ज्या प्रकारे भाजीपाला खरेदी करण्यासाठी भाजी मंडई असते.., त्याच पद्धतीने शेअर्स खरेदी करण्यासाठी शेअर मार्केट असते… तर मग का..? देशातील सर्वच लोक स्वतः स्टॉक एक्सचेंज मध्ये जाऊन शेअर खरेदी करतात का..? तर नाही.. समजा कोणी ” ॲमेझॉन “(Amazon) वरुन काही सामान मागत असेल.. तर ते का “अमेझॉन ” च्या ऑफिस मध्ये जाऊन खरेदी करतात का.? तर नाही..( ऑनलाइन ) online ऑर्डर दिली की सामान घरी येते.. त्याच पद्धतीने शेअर मार्केट आहे.. ” बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE ) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ( NSE )” मध्ये शेअर्स ची ऑर्डर दिली जातात.. शेअर्स खरेदी करुन ते विकणे सगळं काही या “स्टॉक ( Stock Market ) एक्सचेंज” मध्येच होतं असते… त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो… हे करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धती चा वापर करावा लागतो . त्यासाठी आपल्याकडे डिमॅट ( Demat ) अकाउंट असणे गरजेचे असते..

       पण आजच्या आपण ही माहिती का घेत आहोत..? आपल्याला माहित आहे राजकारणी लोकांच्या मुख्य काम राजकारण करणे आहे.. जनतेचे प्रश्न सोडवणे.., देशाच्या हिताची कामे करून देश पुढे चालवणे  हेच राजकारणी लोकांचे मुख्य काम असते.. पण जेव्हा ही माहिती (Rahul Gandhi) राहुल गांधीने त्यांचा पैसा शेअर्स मार्केट मध्येही लावला आहे… आणि हा मुद्दा जेव्हा चर्चेत आला त्यांनी गुंतवणूक 2014  त्यानंतर केली आहे.. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या त्यांच्या संपत्ती विवरणामध्ये याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे हा देशातील Top चा विषय बनला.. अशी माहिती समोर आली आहे की “राहुल गांधीने”.. 05 वर्षात सहा करोड रुपयाचे शेअर्स खरेदी केली आहे.. आणि त्यांची एकूण गुंतवणूक 20 करोड पेक्षाही जास्त आहे..

Rahul Gandhi Income..! राहुल गांधी यांचे गेल्या 5 वर्षातील उत्पन्न 6 कोटी रुपये, त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे..! ते एक खरंच सफल गुंतवणूकदार आहेत का.?!
Rahul Gandhi : X Social media

       ही सर्व माहिती कुठे मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शेअर्स खरेदी केले तर अंबानी – अडाणी च्या कंपन्यांच्या पण केले का..? एवढी तर माहिती समोर आली “राहुल गांधीने”. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे.. ही माहिती पुढे कशी आली.., तर (Loksabha-2024 ) लोकसभा 2024 ची आचारसंहिता चालू आहे… त्यांनी आपला मतदारसंघातून लोकसभेसाठी अर्ज केला… त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण केले आहे.., त्यात त्यांनी अशी माहिती दिली ” 4 करोड, 33 लाख, 60 हजार रुपये” किंमतीचे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स आहेत.. 15 मार्च 2024 पर्यंतचा हा सर्व डेटा आहे.. राहुल गांधी यांचा 20 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ आहे., त्यामध्ये त्यांनी “इक्विटी ” मध्ये सहा करोड रुपयांची गुंतवणूक आहे.., (Mutual fund) “म्युचल फंड ” मध्ये 3.75 करोडची गुंतवणूक आहे. ” शेअर मार्केट मध्ये जवळपास 4.50 करोड” रुपये ची गुंतवणूक आहे.. “PPF scheme” मध्ये 61 लाख रुपये गुंतवणूक आहे.. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांचा पोर्टफोलिओ समोर आला.

https://mahadigitalnews.com/राहुल-गांधी-एक-सफल-गुंतवण/
Image source : livemint.com

     ( Rahul Gandhi ) राहुल गांधीने निवडणूक नामांकनामध्ये  ही सर्व माहिती दिल आहे., शेअर्समध्ये., ( Mutual fund ) म्युचल फंड मध्ये ( GOLD Fund )गोल्ड फंड मध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. “राहुल गांधीने”.. टाटाच्या ( TATA ) कंपनीपासून ते ( ICICI BANK ) पर्यंतच्या सर्व Top दहा कंपन्याचे शेअर्स त्यांनी खरेदी केले आहेत. त्यामध्ये काही Large Cap., Small Cap कंपन्याचाही समावेश आहे..,

राहुल गांधी यांच्या प्रमुख शेअर्स असणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?

     त्यामध्ये ITC, ICICI BANK, Bajaj finance, Asian paint, Infosys ,TCS, Britannia industries, Titanic company. etc. कंपन्या चा समावेश आहे. “राहुल गांधी”.. देशातील एवढे मोठे नेते आहे.., अशा प्रकारच्या ब्रँडची ( Brand ) माहिती आपल्याला एखाद्या खास व्यक्तीकडून मिळत असते… याचा अर्थ असा होतो मार्केटमध्ये ह्या ब्रँडची पहिल्यापासूनच ( Value ) आहे. त्यांची गुंतवणूक करणारे किंवा गुंतवणुकीचा सल्ला देणारे लोक खास दर्जाचे नक्कीच असणार.. विशेषता त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये.. “अंबानी आणि अडाणीच्या” कोणत्याच कंपन्याचा समावेश नाही. त्याचबरोबर RBI च्या ( Sovereign Gold Bond ) योजनेमध्येही 15.27 लाख रुपये गुंतवणूक केली आहे..  

https://mahadigitalnews.com/राहुल-गांधी-एक-सफल-गुंतवण/
Image source: livemint.com

देशात हा मुद्दा का गाजत आहे?

          तर काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी ( RBI ) आरबीआयचे गव्हर्नर ( Raghuram Rajan ) “रघुराम राजन”.. यांना एक मुलाखत दिली होती.., त्यात त्यांनी असं सांगितलं होते की., “शेअर्स मार्केट risky आहे”. मग साहजिकच जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणारच.., तुम्ही एवढी मोठी गुंतवणूक शेअर्स मार्केटमध्ये कसी काय केली..? जनतेचा असही म्हणणं आहे.. तुम्ही सरकारवर आतापर्यंत आरोप लावत आलात.., “मोदी सरकार” ( Modi government ) उद्योगपदी साठीच काम करते.., गरिबासाठी काही करत नाही. तुम्ही पण.., त्यांच उद्योगपतींचे शेअर्स खरेदी करून त्यांना मजबुत करण्याचे काम केले आहे.., “एवढेच नाही तर काही जनतेचे असे ही म्हणणं आहे”.., तुम्ही ज्या कंपन्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.., त्यामध्ये अशा किती कंपन्या आहेत की ज्या “ओबीसी किंवा दलिता ” मार्फत चालवल्या जातात..? तुमच्या राजनीतीची सुरुवात तर इथूनच होते..

ही राजनीती आहे सवाल जवाब तर होतच राहतात. 2014 च्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक नव्हती. सध्या “राहुल गांधींचा , रघुराम राजन” सोबतच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे… त्यात त्यांनी शेअर मार्केट Risk आहे… ही एक विशेष माहिती दिली होती… त्यांचं म्हणणं असं होतं.., जे सर्वसाधारण लोक गुंतवणूक करतात.., कोणत्या प्रकारे करतात .. त्यांनी आपलं संपूर्ण आर्थिक नियोजन करून गुंतवणूक करायला पाहिजे..! ज्यांची संपूर्ण वर्षाची  Income 1 लाख रुपयांच्या कमी आहे. त्यांच्यासाठी शेअर मार्केट Risky असू शकते.. त्यांचे असं बोलणे ही काही लोकांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.. कारण – तुमच्याकडे पैसा आहे, म्हणून तुम्ही काहीही करू शकतात… पण ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, त्यांनी शेअर मार्केटचा विचारही करू नाही का..?

हे पण वाचा Nifty, Sensex Close At Record Highs: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी Nifty 50 आणि sensex मध्ये विक्रमी वाढ..!

     आता राहिला ( Rahul Gandhi) राहुल गांधीचा प्रश्न शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचा त्यांना वर्षाला 10 % जरी रिटर्न मिळाला तरी चांगल्या प्रकारे नफा मिळतो… जवळपास 90 लाख रुपये रिटन वर्षाला मिळतात. त्यांच्या पोर्टफोलिओ मुळे अजून एक गोष्ट स्पष्ट झाली.., त्यांचा पोर्टफोलिओ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विभागला गेला आहे..! जसं की,  consumer, health, IT, Finance.. याचा अर्थ असा होतो..! त्यांनी एक समजदार गुंतवणूकदाराच्या भूमिकेत “सगळा पैसा एकाच ठिकाणी लावला नाही”.! आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मधील त्यांचा पैसा NIFTY 50 च्या कंपनीमध्ये लावलेला आहे.

राहुल गांधीच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं काय आहे?

      जन सामान्य गुंतवणूकदार जे कि “शेअर मार्केटमध्ये” गुंतवणूक करतात.. त्यांनी जर गुंतवणुकीचे सिद्धांताचे पालन केले..! तर निश्चितच फायदा होऊ शकतो. जसं की, “दीर्घ काळाचा विचार करून गुंतवणूक करणे”, या व्यतिरिक्त तुम्ही निवडलेली कंपनी “Good Investment“साठी योग्य आहे का.?  “self investment” करा. ‘कंपनीचा होमवर्क करून गुंतवणूक करा’..! ‘जबरदस्ती लोकांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका’.. आणि “शेअर्स मार्केट शिकणं कधी बंद करू नका”.! आणि तुमचा सगळा पैसा..! “एका क्षेत्रातील कंपनीमध्ये  दावाच्या स्वरूपात लावू नका”.. ! हे काही महत्त्वाचे शेअर मार्केटमध्ये गोल्डन नियम आहेत. (“Warren buffen”) च पण हेच म्हणणं आहे..! तुम्ही तुमच्या पैसा एका ठिकाणी गुंतवणूक करू नका.. ! राहुल गांधींनी त्यांचा पोर्टफोलिओ वेगवेगळ्या क्षेत्रात विभागला आहे.., तो एक चांगल्या गुंतवणूकदाराचा नक्कीच गुण आहे..!

 

 

Scroll to Top