“Sangharsh yoddha”- Manoj jarange Patil movie 2024 : यांच्या जिवनपटावर आधारित चित्रपटाची चाहत्यांना लागली उत्सुकता!

“Sangharsh yoddha”- Manoj jarange Patil 

मराठा आरक्षणावर आपली प्रखर भूमिका मांडणारे आजच्या घडीचे नेते मनोज जरांगे  पाटील  ( Manoj jarange Patil ) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच म्हणजे याच महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खूप वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या मोर्चा, आंदोलन आपल्याला पाहायला मिळाले. या आंदोलनातूनच पुढे आलेले सर्वसामान्य नेते म्हणजे मनोज जरांजपे पाटील. त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक आंदोलन आपल्या राहते गाव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून छेडले. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातून भरभरून पाठिंबा मिळाला. यां आंदोलनाची दखल घेऊन सरकारने तातडीने पाऊल उचलले व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले.

मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या एका खंबीर नेत्याचा जीवनपट आता “संघर्ष योद्धा” – मनोज जरांगे पाटील….. या चित्रपटाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी प्रक्षेपित होणार आहे.

हे आहेत चित्रपटातील महत्त्वाचे कलाकार!

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी केली आहे. तसेच या चित्रपटात सागर कारंडे, संदीप पाठक, अरबाज शेख, संजय कुलकर्णी, श्रीनिवास पोकळे, मोहन जोशी, विजय मिश्रा, विनीत भांडे, सुनील गोडबोले, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके व माधव अभ्यंकर इत्यादी अभिनेत्यांनी या चित्रपटात आपली भूमिका साकारली आहे.तर सुरभी हाडे, माधवी जुवेकर, उर्मिला डांगे इत्यादी अभिनेत्री आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात.

          अभिनेते मोहन जोशी यांनी जरांगे पाटील यांच्या वडिलांचे भूमिका साकारले आहे.

Untitled design 20240403 153025 0000
Source : Instagram social media

Manoj jarange Patil; चित्रपटाविषयी थोडक्यात माहिती अशी आहे!

संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती व लेखन गोवर्धन दोलताडे यांनी सोनाई फिल्म क्रिएशन निर्मिती संस्थेच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाची संवाद व पटकथा डॉक्टर सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. तर रामदास मेंदगे, जान्हवी तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलतांडे, नर्मदा सिव्हिजन्स यांनी सहनिर्माते म्हणून काम पाहिले आहे.

नुकत्याच या चित्रपटातील एक गाणे ” उधळीन जीव…. ” अजय गोगावले यांच्या आवाजातील प्रक्षेपित झाले आहे. या गाण्याचे लेखन वैभव देशमुख यांनी केले असून या गाण्याचे गीतकार विजय नारायण गवंडे हे आहेत.

        अजय गोगावले यांच्या काळजाला भिडणाऱ्या आवाजामुळे तसेच या गाण्यातून मनोज जरांगे पाटील यांची साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता ताणले गेली असतानाच, त्यात या गाण्याची भर पडली आहे.

Scroll to Top